Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले व रमाई भीमराव आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सवाचे काटोल येथे आयोजन.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 नागपूर : काटोल शहर येथे " त्रिरत्न  सांस्कृतिक महिला मंडळ, काटोल द्वारा आयोजित, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्य, बुद्ध भीम रमाई गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम दिनांक - 9 फेब्रुवारी 2026 रोज सोमवारला  वेळ : दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत स्थळ - जिल्हा परिषद पटांगणावर, सादर करते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक - बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा   बुलंद आवाज भीमेस भारती काटोल, तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्म ज्योती शिंदे यांच्या बुद्ध भीम गीतांच्या समाज प्रबोधन कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - त्रिरत्न  सांस्कृतिक महिला मंडळाचा अध्यक्ष गायिका मीना पाटील, आशा मेंढे, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे, समस्त समाज बांधव मंडळाच्या सर्व महिला कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या