चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : विदर्भातील नागपूरच्या सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिक ॲड.मेघा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहज सुचलं मेरी आवाज सुनो गृपच्या मुख्य संयोजिका चैताली आतराम यांची सामाजिक क्षेत्रातील कामगिरी आज पर्यंत अतिशय उल्लेखनीय अशी ठरली आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल नगरीत दोन वर्षांपूर्वी लोकहितच्या वतीने पत्रकार भवनात पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांना कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.या वेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली होती.सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे.शहापूर ठाणे येथे देखील नुकताच त्यांना कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
चैताली आतराम यांच्या कार्यावर एक ओझरती नजर !
गरजू लोकांना मदत
गरीब, अपंग, वृद्ध, महिला, मुले यांना मदत करणे या शिवाय
शासकीय योजना, पेन्शन, रेशन, आरोग्य सेवा मिळवून देणे
महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव धडपड करणे,
महिलांवरील अन्यायाबाबत आवाज उठविणे, घरगुती हिंसाचाराबाबत मदत करणे
बालमजुरी, बालविवाह रोखण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम राबविणे
शिक्षण व आरोग्य
मुलांच्या शिक्षणासाठी मदत, शाळेत दाखल करून देणे
आरोग्य शिबिरे, लसीकरण, स्वच्छतेबाबत जनजागृती व
समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे
कुटुंबातील वाद, व्यसनमुक्ती, बेरोजगारी यावर सल्ला देणे
गरज असल्यास संबंधित कार्यालयात अर्ज, तक्रार करण्यासाठी धावून जाणे
समाजजागृती
मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणे, स्वच्छता, पर्यावरण, कायदे याबद्दल लोकांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक वेळी सभा, रॅली, कार्यक्रम आयोजित करणे,प्रशासनाशी संपर्क ठेवणे या व्यतिरिक्त ग्रामपंचायत, नगरपालिका, पोलिस प्रशासन,महसूल विभाग, जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाशी समन्वय साधणे
विद्यार्थी वर्गांसाठी ज्या गावात बस जात नाही त्या ठिकाणी गाव पातळीवर चर्चा करून मार्ग काढणे
आदिं कार्य चैताली आतराम ह्या निस्वार्थी भावनेतून हाताळीत आहे.यंदा सहज सुचलं -जनहिताच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या प्रेरणा पुरस्कार यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे.लवकरच तो पुरस्कार समारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगरीत होत आहे.


0 टिप्पण्या