Ticker

6/recent/ticker-posts

जय जिवाजी क्रांती सेना बल्लारपूर यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.


 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 चंद्रपूर : बल्लारपूर येथे जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे आयोजक जय जिवाजी क्रांती   महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष गणेश वनकर यांच्या नेतृत्वात गणेश प्लाझा हेअर सलून, बल्लारपूर येथे पार पडला. 

यावेळी छत्रपती शिवाजी म़हाराज यांचे पराक्रमी शिवरक्षक जिवाजी महाले व शिवाजी काशीद यांच्या  प्रतिमा देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर रॅलीमध्ये ज्युस वाटप करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर नगरपरिषद नगराध्यक्ष सौ. अल्काताई डॉ. अनिलजी वाढई, बल्लारपूर पोलीस स्टेशन उपनिरीक्षक भास्करजी कुंदावार, बल्लारपूर माजी नगराध्यक्ष घनश्यामजी मुलचंदाणी, बल्लारपूर माजी नगरउपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक लखनसिंगजी चंदेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ सोमानी, बल्लारपूर भाजपा शहराध्यक्ष काशीसिंग भैय्या, बल्लारपूर नगरसेवक प्रणित भाऊ सातपुते, बल्लारपूर नगरसेवक सचिनभाऊ (दादू) तोटावार, बल्लारपूर नगरसेवक रविभाऊ मातंगी, उलगुलान संघटना मुंबई संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ जोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सामाजिक कार्यकर्ते चेतन भाऊ गेडाम, छाबडाजी, अमोल भाऊ वासेकर, सोनू भाऊ, श्रीनिवास गोपालजी कडेल, दिनेश आस्वानी, शुभम रहिकवार, अजय वाघमारे उपस्थित होते.
नाभिक समाजाचे मार्गदर्शक सल्लागार अशोकजी इनमवार, सल्लागार शंकरजी दर्वे, सहसल्लागार पुरुषत्तमजी नागतुरे, युवा मार्गदर्शक संजयजी वटाणे, संघटक प्रमुख शंकर भाऊ चौधरी, जय जिवाजी क्रांती सेना सचिव सतीश भाऊ नारायणदास, उपाध्यक्ष सूरज भाऊ नागतुरे, नाभिक महामंडळ सलून असोसिएशन अध्यक्ष पप्पू भाऊ जंम्पलवार, उपाध्यक्ष कृष्णा एगंदलवार, सचिव प्रदीप शर्मा, सहसचिव रवी भाऊ कोत्तागट्टूवार, तसेच सुरेश गज्जला, सूरज नागपुरे, सूरज वाजा, अजय अण्णा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या