चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील माधवराव महाराज चौक येथे १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा अनेकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल रामकृष्ण हनवते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समीर खान पठाण, कृषी सहायक पंकज सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ता प्रभाकर दोडके, प्रमोद कोसुरकार, लोकेश कोकुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे, गायकवाड ,बंडु दडमल, वसंता भरडे,तंटामुक्त समितीचे सदस्य अमर बागेसर,सिंगलदिप पेंदाम, हुशेन शेख,प्रज्वल बोढे,क्रिश कोसुरकार, अमोल महागमकार,क्रिष्णा नन्नावरे,भारत कोकुडे, स्वप्निल दडमल, रोशन श्रिरसागर , माजी ग्रामपंचायत सदस्या अमृता कोकुडे,लता नन्नावरे,आशा कोकुडे, निराशा नन्नावरे, सुनिता कोसुरकार, कल्पना कोसुरकार,ओंमकार राखुंडे,पावणी कोकुडे,सक्षम निकोडे, शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, राहुल कोसुरकार , मंगेश हनवते, शंकर दडमल, देवानंद दोडके, निखिल दोडके,आदिं प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या