सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- राज्य कार्यकारिणी बैठकीत एन् टीव्ही न्यूज मराठीचे संपादक इकबाल शेख यांच्यावर डिजीट मिडीयानेमोठी जबाबदारी सोपली आहे त्यांच्या 28 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभव अणि संपादकीय कार्याची दखल घेत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची एकमुखी निवड करण्यात आली असल्याने सर्व स्थरातुन इकबाल शेख याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी, अहिल्यालगर येथील एन टीव्ही न्युज मराठी महाराष्ट्र या वृत्त वाहीनिचे मुख्य संपादक इकबाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.
इकबाल शेख यांच्या निवडीमुळे डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे इकबाल शेख हे गेल्या 28 वर्षापासून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागांत वरिष्ठ पत्रकार म्हणून अखंडपणे कार्य रथ आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्याचा दांडगा अनुभव आणि पत्रकाराच्या विविध अडचणी व समस्या सोडवण्यासाठी असलेली त्यांची तळमळ यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना हि देशातील डिजिटल क्षेत्रातील अग्रगण्य संघटना माजली जाते महाराष्ट्र, गोवा कर्नाटक आणि आध प्रदेश या राज्यांत संघटनेचे मोठे जाळे पसरलेले आहे. इकवाल शेख यांनी या संघटनेच्या विस्तारासाठी आणि मजबुतीसाठी मोठे योगदान दिले असून, त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत हि जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे इकबाल शेख यांची प्रदेश उपाध्यक्षपती निवड झाल्याबद्दल राजकीय सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकाराच्या कल्याण आणि सुरक्षिततेसाठी आपण आगामी काळात अधिक जोमाने काम करू, असा विश्वास निवडीनंतर इकबालशेख यांनी व्यक्त केला आहे डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात इकबाल शेख यांच्यासारखा अनुभवी नेतृत्वामुळे संघटनेची ताकद महाराष्ट्रभर वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा सूर या बैठकीत उमटला होता.


0 टिप्पण्या