Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार राम चिंतलवाड यांना डॉ पंजाबराव देशमुख कला गौरव पुरस्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील प्रखर, कार्यशील व निडर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले वारंगटाकळी येथील पत्रकार राम संभाजी चिंतलवाड यांना  डॉ पंजाबराव देशमुख कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान काल दि. १५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे आयोजित भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन दरम्यान, बिरसा मुंडा शांती नगरी, शिव–पार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक येथे प्रदान करण्यात आला.
पत्रकार चिंतलवाड यांनी दैनिक चालू वार्ता,  दैनिक योद्धा बातमीचा , दैनिक लोकनेता व दैनिक लोकन्याय या दैनिकांत तालुका प्रतिनिधी म्हणून प्रभावी काम केले आहे. तसेच त्यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका सचिव, लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तालुकाध्यक्ष अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून सध्या ते राज्य मराठी पत्रकार परिषद, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. समाजहितासाठी कटिबद्ध राहून निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल वारंगटाकळी गावासह संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी पत्रकार परिषद मराठवाडा विभागीय अध्यक्ष शुद्धोधन हानवते, नांदेड जिल्हा अध्यक्ष देवानंद गुंडेकर, जिल्हा संघटक गंगाधर गायकवाड, सहसंघटक प्रशांत राहुलवाड, हिमायतनगर तालुकाध्यक्ष अनिल नाईक, तालुका कार्याध्यक्ष कैलास कांबळे, उपाध्यक्ष मनोज तपासकर, तालुका सचिव सुभाष गुंडेकर, शहराध्यक्ष येणेकर यादव, तालुका महासचिव सदाशिव पतंगे यांच्यासह राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या