Ticker

6/recent/ticker-posts

वेकोलि तर्फे महिलांना साहित्याचे वाटप व मार्गदर्शन आजिवीका विकास कार्यक्रम संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भद्रावती : डॉ. हेमंत शरद पांडे, संचालक (मानव संसाधन), WCL यांच्या मार्गदर्शनाखाली  वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) यांच्या सहकार्याने महिलांसाठी एकात्मिक आरोग्य व आजीविका विकास कार्यक्रमांतर्गत अपेक्षा होमियो सोसायटीमार्फत विविध आजीविकेसंबंधी साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय राकेश प्रसाद, एरिया जनरल मॅनेजर, माजरी क्षेत्र उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत भद्रावती तालुक्यातील १० गावांमधील एकूण १०९ महिलांना रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान कपडा व्यवसाय, शिवणकाम, स्टेशनरी व्यवसाय, शेळीपालन, किराणा दुकान, ब्युटी पार्लर व्यवसाय, झेरॉक्स मशीन व्यवसाय इत्यादी क्षेत्रांशी संबंधित महिलांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

महिलांना साहित्य वितरण करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे त्या स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, सकारात्मक आयुष्य जगाव्यात तसेच स्वतःच्या व कुटुंबाच्या उपजीविकेला बळकटी द्यावी हा आहे.

या प्रसंगी आदरणीय वसुधा प्रसाद (अध्यक्षा, सुरभी महिला मंडळ, माजरी क्षेत्र),  श्रीनिवास राव (एरिया एचआर मॅनेजर, माजरी क्षेत्र),  मंगेश वानखेडे (एरिया नोडल अधिकारी – CSR, माजरी क्षेत्र),  अशोक जोशी (व्यवस्थापक – मानव संसाधन, माजरी क्षेत्र), आदरणीय डॉ. मधुकर गुंबाळे (संचालक – अपेक्षा होमियो सोसायटी), संजीवनी पवार (प्रोजेक्ट डायरेक्टर – अपेक्षा होमियो सोसायटी), अक्षय पवार (डेप्युटी मॅनेजर – सीडी) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या