Ticker

6/recent/ticker-posts

जामखेडमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठिय्या आंदोलन; सात दिवसांत नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- रब्बी उन्हाळी हंगाम 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष जामखेड तालुका व स्वाभिमानी संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी सकारात्मक भूमिका घेत सात दिवसांच्या आत नुकसानभरपाई वितरित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. 
    तसेच मंत्रालय, मुंबई येथील मदत व पुनर्वसन विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांचा ई-मेल प्राप्त झाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
नगर जिल्ह्यासाठी 11 कोटी 60 लाख रुपये नुकसानभरपाईचा निधी मंजूर होऊन जमा झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, चार महिने उलटूनही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात जमा झाले पाहिजेत, अन्यथा तहसीलची गाडी ताब्यात घेऊ असा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी दिला.
तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार यांनी सांगितले की प्रहार संघटना शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी कटिबद्ध असून सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
आंदोलनात सचिन उगले (दिव्यांग संघटना, प्रहार), पंढरीनाथ दौंड (जिल्हा शेतकरी प्रतिनिधी), बंडू उगले, महादेव उगले, राहुल भालेराव (जि.प. गटप्रमुख, प्रहार), अंकुश वाघ, लक्ष्मण दौंड, गोरख जाधव, बापूराव जाधव, तात्याराम जाधव, लहू वाघ, गौतम दौंड, दशरथ दौंड, बापूराव तांदगे, केशर दौंड, पंढरीनाथ पवार आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
शासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी सात दिवसांत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या