चित्रा न्युज प्रतिनिधी
शेगाव :-दि .25:-आज दि 25 फेब्रुवारी शेगाव येथे आयुष मंत्रालय भारत सरकार व अ.भा.आयुर्वेद महासंमेलन आयोजित *राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026* च्या उद्घाटन सत्रात *भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते आदरणीय वैद्य रामदास आव्हाड सर यांना त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.* यावेळी *महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.आचार्य देवव्रत जी, मा.श्री.प्रतापरावजी जाधव* (राज्यमंत्री आयुष स्वतंत्र प्रभार), इतर मंत्रीगण, आयुष सेक्रेटरी पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा सर ,अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेन्द्रजी त्रिगुणा सर व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी वैद्यगण, व सहा हजाराहून अधिक विद्यार्थी ,डॉ उपस्थित होते.
डॉ.रामदास आव्हाड यांनी आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या 4 दिवसीय आरोग्य मेळाव्यासाठी हजारो वैद्यगण व लाखाहून अधिक सामान्य जन उपस्थित राहणार आहेत. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या महामयीन आ द्रौपदी मुर्मूजी यांचे शुभहस्ते आजपर्यंतचा सर्वोच्च सन्मान मिळणे हि आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कामाची पावती आहे अशी उस्फुर्त प्रतिक्रिया पुरस्कारार्थी डॉ रामदास आव्हाड यांनी व्यक्त केली


0 टिप्पण्या