Ticker

6/recent/ticker-posts

नेहरू नगर भोजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर यांच्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे बहुजन प्रतिपालक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष योगेश मेश्राम यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश मेश्राम उपस्थित होते. तसेच संस्था कोषाध्यक्ष ऋषी गोस्वामी, प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे (एन. जे. पटेल कॉलेज, मोहाडी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी स्वराज्याची संकल्पना साकार करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास नितेश धारगावे, देवेंद्र धारगावे, राजेंद्र तिरपुडे, मार्कंड मेश्राम, अदिती धारगावे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र गणविर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या