Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती व कै.अनंतराव भोसले पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नेञ शिबीर संपन्न..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:अनंत प्रतिष्ठान हाळी-हंडरगुळी व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र, हंडरगुळी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक डॉ.सचिन राठोड (तालुका आरोग्य अधिकारी, उदगीर),व अध्यक्ष डॉ.हरेश्वर सुळे(वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र, हंडरगुळी) हे होते. तर प्रमुख उपस्थिती शिवशंकर धुप्पे (मा.भाजप तालुका अध्यक्ष उदगीर),विकी भोसले (नुतन पंचायत समिती सदस्य, उदगीर), मा.सरपंच विजयकुमार आंबेकर,डॉ.सुरेश तिवारी,डॉ.महेश समगे (उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर), बापूराव जाधव (मा. सरपंच रुद्रवाडी), आबा तेलंगे गुरूजी,अमोल भोसले (अध्यक्ष,अनंत प्रतिष्ठान) इत्यादी उपस्थित होते.
   यावेळी 122 नागरिकांनी नेत्र तपासणी केली. त्यापैकी 38 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियाची शिफारस करण्यात आली असून सदरील पेशंटची उदगीर लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरास हाळी,हंडरगुळी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या