Ticker

6/recent/ticker-posts

खुले कारागृह मोर्शी येथे सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी अंतर्गत खुले कारागृह येथे सिकलसेल तपासणी करण्यात आली अरुणोदय विशेष मोहीम अंतर्गत सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सिकलसेल पूर्णतः नाहीसा करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक यांचे समुपदेशन व औषधोपचार केल्या जात आहे.
या मोहिमे अंतर्गत 0 ते 40 वयोगटातील सर्वांची मोफत तपासणी करून घ्यायची आहे ही मोहीम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांच्या  मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून  या तपासणी शिबिरामध्ये खुले कारागृह चे अधीक्षक सतीश हीरेकर खुले कारागृह चे कर्मचारी उमेश रामपूरकर, अरविंद चव्हाण, नितीन खोब्रागडे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री आशिष पाटील, लुंबिनी साने, नम्रता ठाकरे, विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, प्रकाश मंगळे, नंदू थोरात यांनी सहकार्य केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या