Ticker

6/recent/ticker-posts

वाढवण्यात शांतता समिती बैठक संपन्न...पोलिस मिञांना दिले कॅप व टी.शर्ट....


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :--लातुर जिल्हा पोलीस प्रमुख अमोल तांबे,अप्पर पोलीस प्रमुख मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व अरविंद रायबोले उपविभागीय पो. अधिकारी अमदपुर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी शिवजयंती,रमजान महिना आदी सण,उत्सवाच्या पार्श्वभुमीवर वाढवणा येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली.
यावेळी शिवजयंती,शांतता समिती सदस्य,पोलीस मिञ पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
शासन आदेशानुसार डी.जे. डाॅल्बीचा वापर कुणीही करुनये. पोलीस व नागरिक यांच्यात जवळीकता निर्मान व्हावी,म्हणुन उपविभागात ग्रामभेटीचा नवा उपक्रम सुरु केला आहे.अशी माहिती या प्रसंगी बोलताना उपविभाग पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी उपस्थितांना दिली.
तसेच पो.स्टे.वाढवणांतर्गत गु.र.नं.२९८/२०२५ मध्ये घडलेल्या घटनेतील जख्मी १ वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या मम्मी,पप्पाचे प्राण दवाखान्यात दाखल करुन वाचविणा-या चैतन्य नंदगावे रा.राचन्नावाडी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच पोलीस मिञांना कॅप व टी शर्ट देऊन त्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. सपोनि.एस.पी.गायकवाड, पोउपनि.प्रवीण हालसे यांच्यासह एस.के.रंगवाळ,एस.पी.दळवे, एस.आर.केंद्रे टी.टी.बळदे, डी.वाडकर इ.पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या