Ticker

6/recent/ticker-posts

परसबाग सोलापूर : बाग कर्मी सन्मान सोहळा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर : परसबाग सोलापूर या पर्यावरणीय व्यासपीठाच्यावतीनें परसबागच्या संस्थापिका स्व.सौ.शुभदा नारायण पाटील यांच्या स्मृती निमित्ताने सोलापूरच्या पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सोलापूर शहरातील १५ ज्येष्ठ बागकर्मींना सन्मानपत्र देऊन  त्यांच्या प्रदीर्घ पर्यावरणीय संवर्धन कार्याचा गौरव  करण्यात आला.

रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एस पी एम स्कुलच्या  सभागृहामध्ये  हा सन्मान सोहळा पार पडला.

या सन्मान सोहळ्यास दै.सकाळचे सह संपादक श्री.सिध्दाराम पाटील, पुणे येथुन पर्ण पुष्प कलाकृतीकार ॲडव्होकेट अविनाश कुलकर्णी, अकलुजहुन प्रा. रामलिंग सावळजकर,देशी वृक्ष संवर्धक श्रीराम रामदासी आणि परसबाग सोलापूरचे संस्थापक श्री.नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्वांच्या हस्ते १५ ज्येष्ठ बागकर्मींना " सन्मान पत्र " आणि  परसबागच्या ३६ " कार्यकुशल  बागकर्मींना " कृतज्ञता प्रमाण पत्र " देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर संस्थापिका स्व.सौ.शुभदा पाटील यांना अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सन्मान सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.सलग दुस-या वर्षी सोलापूरातील घरगुती बागकाम आणि सोलापूर शहराच्या पर्यावरण  क्षेत्रात अशाप्रकारचा कार्यक्रम होत असल्याची माहिती श्री.नारायण पाटील यांनी याप्रसंगी दिली.

" संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन " ही परसबाग ची प्रारंभिक कार्य संकल्पना आहे. आपण घराघरातून  पर्यावरणीय संस्कारक्षम पिढी निर्माण केली तरच  सोलापूर शहराच्या पर्यावरणात सुखावह, आनंददायी स्थिरावह बदल होऊ शकणार आहेत. ग्राऊंड लेव्हलवर रचनात्मक पध्दतीनें समरसुन काम करत  परसबाग पर्यावरणीय व्यासपीठ  यावर विषेश भर देत आहे. सोलापूर शहरातील ज्येष्ठ बागकर्मींनी नकळतपणे हे काम यापुर्वीच पार पाडलेले आहे.  आजही आणि यापुढेही  त्यांच्या या कामाची आत्यंतिक गरज ओळखुन परसबागनें या सोहळ्याचे आयोजन केले होते. 

सोलापूर शहरातील आजची  पर्यावरणीय स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यासाठी घरगुती बाग आणि देशी वृक्ष संवर्धनाच्या रुपात निसर्गालाच आपल्या  घरासमोर आणुन प्रस्थापित करावे,ती सोलापूरची निकडीची गरज आहे  असे आवाहन श्री.सिध्दाराम पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शनपर  बोलताना केले. ॲडव्होकेट अविनाश कुलकर्णी (पुणे) यांनी आपल्या पर्ण पुष्प कलाकृती ंचा प्रवास सांगितला.
प्रा.रामलिंग सावळजकर, श्रीमती लीला हरचेकर, श्रीमती अनिता शिंदे या ज्येष्ठ सन्मानकांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

सन्मान सोहळ्याचे व्यवस्थापन श्री.शिरीष गोळवलकर यांनी केले. कु.अनुश्री गोळवलकर या उभरत्या युवतीनें सुत्र संचालनाची जबाबदारी पार पाडली. तिला सौ.सुप्रिया कुलकर्णी तोरवी, सौ.सुप्रिया ठाणे, सो.शा़ता येळंबकर,सौ.वैशाली कुलकर्णी यांनी निवेदनाची साथ दिली.सौ.सुनिता सोनवणे यांनी दीप प्रज्वलनाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली.श्री.शिरीष गोळवलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

"*यांचा झाला सन्मान...*"

(१) श्रीमती लीला विद्याधर हरचेकर (वय ८४ , बागकाम ५५ वर्षांपासून ) 

(२) श्रीमती झरिन सॅम आमरिया ( वय ८६ वर्षे , बागकाम ६३ वर्षापासुन ) 

(३) श्रीमती अनिता श्रावण शिंदे (८४ वय वर्षे , बागकाम ५५ वर्षांपासून ) 

(४) सौ.गुरुचरण कौर मंजितसिंग गेहदु (वय वर्षे ७२ , बागकाम ३५ वर्षांपासून )  

(५) श्री.चंद्रकांत पंढरीनाथ कोडगीरवार (वय वर्षे ७४, बागकाम ४० वर्षांपासून ) 

(६) सौ. सुनिता व श्री.अशोक पंढरीनाथ सोनवणे ( वय ६४ वर्षे, बागकाम १५ वर्षांपासून )

(७) सौ.रेवती व श्री.निर्मलप्रसाद दत्तात्रय कुलकर्णी ( वय ६४ वर्षे, बागकाम ३५ वर्षांपासून )

(८) श्री.रविंद्र पांडुरंग जांबोटकर (वय ६८ वर्षे , बागकाम ३० वर्षांपासून )                                      

(९) श्री.गुरुदेव सिद्रामप्पा बागलकोटी (वय ६८ वर्षे, बागकाम ५ वर्षांपासून )

१०) श्री. बसवराज चन्नप्पा सावळगी ( वय वर्षे ६४,  बागकाम १५ वर्षापासून )

"*विशेष सन्मान...*"

११) ॲडव्होकेट अविनाश आर कुलकर्णी, पुणे  ( पर्ण पुष्प कलाकृती )

१२) सौ.मंजुषा गाडगीळ (वेलणकर सोनचाफा संवर्धन)

१३) श्री.देवेंद्र बाळकृष्ण बडे ( वय वर्षे ७१ ) माती विरहीत बागकाम

१४) प्रा.रामलिंग लक्ष्मण सावळजकर,अकलुज - बोन्साय  ( वय ६३ वर्षे )

१५) प्रल्हाद विठ्ठल काशीद ( वृक्ष संवर्धक )

१६) श्री सिध्देश्वर प्राथमिक शाळा, सोलापूर .(उल्लेखनीय कार्य)

"*एक बाटली पाणी झाडांसाठी*"

मा.मुख्याध्यापिका, ★ सौ.शिल्पा मल्लिकार्जुन वाले
★ वर्ग शिक्षिका सौ.संगिता शिवलिंग बिराजदार 
★विद्यार्थी : इयत्ता तिसरी...
१) कु.निहीरा शितल पाटील 
२) कु.निधी अमोल वाघमारे 
३) चि.गजेंद्र रणजीत टाकळीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या