चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी:-सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सावरी/ मुरमाडी येथे वर्ग 10 व वर्ग 12वी चे विद्यार्थ्यांचा निरोपाचा कार्यक्रम (ता.०७ फेब्रुवारी)रोज शनिवारला आयोजित करण्यात आला. त्या प्रसंगी जीवन शिक्षण संस्था लाखनी चे सचिव धनंजय तिरपुडे यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्या स्वाती वासनिक मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सहा.शिक्षक विजय रिनाईत, मनिषा सुखदेवे, विकास काशिवार, शिक्षिका स्मिता आगाशे, सुरेखा गभणे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी मा अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर प्राचार्य वासनिक मॅडम यांनी सुद्धा स्वयंप्रेरित होऊन परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी सुभाष ठाकरे, शिरिष लोगडे, राऊत, मनोज खोब्रागडे, वंदना आगाशे,साठवणे, कोरे,इत्यादींनी सहकार्य केले कार्यक्रमांचे संचालन कु.पुजा रामटेके तर आभार प्रदर्शन कु मनश्री निर्वाण यांनी केले कार्यकमाची सांगता वंदेमातरम गीताने करण्यात आली.



0 टिप्पण्या