Ticker

6/recent/ticker-posts

यशप्राप्तीसाठी प्रयत्नांची व सातत्याची जोड असावी -विनोद धुर्वे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत कठोर परिश्रम करायला हवे.
कठोर परिश्रमशिवाय कोणतेही यश मिळत नाही.परिश्रमाला सातत्याची जोड असावी लागते.स्वप्नांना प्रयत्नांची जोड असली की यशप्राप्ती होते. 
विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करुन आपली प्रगती साधावी आणि आपल्या शाळे सोबतच गावाचा लौकिक वाढवावा असे प्रतिपादन वन परीक्षेत्रधिकारी विनोद धुर्वे यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरी (मां.) येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्यात विशेष अतिथी म्हणून विनोद धुर्वे बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी चिमूरचे वन परीक्षेत्रधिकारी किशोर देऊरकर होते.सावलीचे परीक्षाविधीन वन परीक्षेत्राधिकारी दत्ता जाधव,क्षेत्र सहाय्यक मेश्राम,माजी विद्यार्थी पुंडलिक धुर्वे,पोलीस पाटील दामोधर धुर्वे, भाऊराव धुर्वे, सिंधु कुमरे,योगिता धुर्वे,विनोद गेडाम, जनार्धन केदार, रावन शेरकुरे, राजश्री आकांत, श्रीकृष्ण खुरसंगे,विनोद बावणे,श्रीकृष्ण धुर्वे,मुख्याध्यापक सुरेश डांगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना विनोद धुर्वे यांनी उपस्थितांना आपल्या पिढ्यांचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय प्राप्त करावे. 
विद्यार्थी आणि तरुणांनी व्यसनांपासून अलिप्त राहिले तरच त्यांचा सर्वांगिण विकास होईल असा आशावाद देखील त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला.
याप्रसंगी वन परीक्षेत्राधिकारी किशोर देऊरकर, दत्ता जाधव, पुंडलिक धुर्वे, रावन शेरकुरे, विनोद गेडाम,जनार्धन केदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आणि सध्या सावलीचे वन परीक्षेत्राधिकारी म्हणून कार्यरत असलेले विनोद धुर्वे, माजी विद्यार्थी पुंडलिक धुर्वे, दामोधर धुर्वे यांचा सन्मानचिन्ह, शाल आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.वार्षिक स्नेहसंमेलनात शालेय विद्यार्थी,माजी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश सुरेश डांगे यांनी केले तर आभार कल्याणी कुलसंगे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या