Ticker

6/recent/ticker-posts

सभा इं.काॅं.ची तरीही आ.अमित देशमुख यांनी केले रा.काॅं.च्या सरपंच व उपसरपंचाच्या कामाचे कौतूक...!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-जि.प.पं.स.निवडणुकीत सत्ताधारी महायुती आमदार मंञी तसेच विरोधी आघाडी चे आमदार,माजी मंञी हे एकमेकांवर वैयक्तीक पातळीवर टिका,टिप्पणी करत असल्याचे पाहण्यात व ऐकण्यात येते.
माञ,वाढवणा व लोहारा गटातील व हंडरगुळी पं.स. गणातील इं.काॅं.पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दि. चार रोजी आ.अमितराव देशमुख यांच्या सभेचे सायं. ६ वा.हंडरगुळीत आयोजन केले होते.पण आ.अमित देशमुख हे तब्बल ३ घंटे लेट आले.हे विशेष..!
मग जाहीर सभेस संबोधित करताना बोलण्याच्या नादात बोलता,बोलता आ.अमित देशमुख म्हणाले की,या ठिकाणची स्वच्छता, तिरंगी स्ट्रीट लाईट व विकास बघून मी खेड्या मध्ये आलोय का,शहरात आलोय.असे ते म्हणताच स्टेजवर उपस्थित वाढवणा व लोहारा येथील उमेदवार, इं.काॅं.चे माजी जि.प.मेंबर यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
कारण,जि.प.वर मागील २ टर्म इं.काॅं.चे जे सदस्य होते  त्यांनी स्वत:च्या हाळी या गावचा विकास करण्यापेक्षा भकास केला.आणि म्हणुन हाळीत सभा ठेवली तर गावात विकास कामांऐवजी भकास दिसेल.म्हणुनच ही सभा हाळीत ठेवण्याऐवजी इं.काॅं.च्या माजी.जि.प. सदस्याने विकास कामाने बहरलेल्या लगतच्याच हंडरगुळी गावात दि.४ रोजी सभा ठेवली होती.त्यावेळी बोलता,बोलता आ.अमित देशमुख यांनी मी खेड्यात आलोय का,महानगरात आलोय?असे म्हणत तेथील कामाचे कौतूक केले.ते गाव आहे हंडरगुळी..
रा.काॅं.चे सरपंच विजय अंबेकर,उपसरपंच बालाजी पाटील यांच्या कामांचे म्हणजे रा.काॅं.तथा भाजप महायुतीचे नाव न घेता या पक्षाच्या ग्रा.पं.ने केलेल्या विकास कामाचे आ.अमित देशमुख यांनी कौतूक,स्तूती केल्याने स्टेजवर उपस्थित असलेल्या व ही सभा आयोजित केलेल्या इं.काॅं. च्या माजी झेडपी सदस्या सह इतरांचे मुखडे/चेहरे बघण्यासारखे झाले होते.व महायुतीच्या उपसरपंचाने केलेल्या विकास कामांचे दस्तूरखुद अमित देशमुख यांनी जाहिर कौतूक केले म्हणुन इं.काॅं.पेक्षा भाजप- रा.काॅं.महायुतीलाच आपले मत दिलेले चांगले.अशी कुजबूज सभा संपल्यानंतर हाळी परिसरातील उपस्थित मतदार करत घराकडे जात होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या