शासनमान्य दुकाणातुनच अवैध विक्रेत्यांना पुरवठा...
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर ते अहमदपुर रोडवर हाळी पासून ५ कि.मी.दुर असलेल्या वायगाव आणि गोकुळनगर पाटीवर मागील कांही दिवसांपासून अवैध देशी, विदेशी दारुची ढाब्या मध्ये विक्री मोठ्याप्रमाणात वाढल्याचे बघून या धंद्याला संबंधिताचे पाठबळ असल्याचा बोलबाला वायगाव परिसराच्या गावात आहे.या अवैध दारु विक्रीमुळे अनेकजण येथून शिरुरताजबंद जाणा-या रोडवर झुलत असल्याचे बघून एखादा 'शराबी' गाडी खाली सापडून प्राणास मुकू शकतो. आणि एखादा अपघात झाल्यावरच कारवाईचे अस्ञ प्रशासन राबविणार का?
ढाब्यात दारु पिणारे आणि विकणारे लोकांवर कारवाई करण्यासाठी राज्य दारुबंदी आयुक्ताने मिशन ढाबा ही मोहिम राबविण्याचे सक्त आदेश देऊन कित्येक माह झाले.तरीही या ठिकाणच्या एकाही ढाब्यावर धाड टाकल्याचे आणि ढाबा मालक व तेथे दारु पिणा-यांवर कारवाई केल्याचे आठवत नसल्याने दारुबंदी विभागच संशयाच्या घे-यात सापडले आहे.म्हणुन आता आदेश देणा-या वरिष्ठांनीच मशीन ढाबा ही मोहिम राबवावी.अशी अपेक्षा या भागातील सर्व शराबीच्या कुटूंबियांची आहे.येथील अवैध दारु विक्रेत्या ढाबे चालकांना हाळी येथील शासनमान्य किरकोळ देशी दारु दुकाणातुन दारुच्या बाॅक्सच्या बाॅक्स पुरवठा केला जातो.किरकोळ विक्री दुकाण असे नामफलक असलेल्या हाळीच्या दुकाण मालकाकडे अवैध दारुची विक्री करणा-यांना ठोकमधे बाॅक्सच्या बाॅक्स विक्री करण्याचा असा कोणता परवाना आहे?व तो कुणी दिलाय?तसेच याच्यावर ही कारवाई करण्याचे धाडस संबंधित दारुबंदी अधिकारी दाखवणार का?असे थेट सवाल सुज्ञ हाळीकरातुन उपस्थित केले जातात.



0 टिप्पण्या