चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा शाखा वणीच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळावा दि.२१ फेब्रुवारी रोज शनिवारी स्थळं शेतकरी मंदीर वणी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी दळे, कार्यक्रमाचे विशेष अतिथी नाभिक समाजाचे लाडके नेते तथा आमदार छत्तीसगड येथील वैशाली नगर विधानसभाचे रितेश सेन, उद्घाटक राजेंद्र भाऊ नागतुरे, शुभांगी ठमेकर, उदय टक्के, माजी आमदार संजयजी रेड्डी बोदकुरवार, आमदार संजय देरकर, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव संजयजी खाडे वणी, नगराध्यक्षा विद्या ताई आत्राम आदी उपस्थित होते.
यावेळी समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील उलेखनीय समाज कार्य करणाऱ्या समाज कार्यकर्ते देवेंद्र कडवे, पुंडलिक कुबडे, निळकंठ तायडे, नगाजी निंबाळकर, पुष्पाताई नक्षिणे, शोभाताई नक्षिणे, अर्चना कडुकर, विजय कडुकर, दीलीप मादेस्वार, बालु येवुलकर, गणेश अतकर, अधिकराव गवळी, कैलास फुलभोगे, अरुण भाऊ नक्षिणे, विलास माहुलकर, दीपक नक्षिणे, अनिल मांडवकर, बंडुभाऊ लाखे, प्रफुल क्षिरसागर, विकासभाऊ क्षिरसागर, संदीप शिंदे, राजु बन्सोड, रवि येसेकर, वर्षाताई वाटेकर, बबन वाटेकर, मोरेश्वर बोरकर, नितीन नागमोते, प्रविण नागतुरे आदींना समाज रत्न पुरस्कार म्हणून सृतीचिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन सन्मानीत करण्यात आले.
या राज्यस्तरीय वधुवर मेळावा कार्यक्रमा करीता महाराष्ट्र नाभिक समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी १७० उप - वधुवर यांनी आपला परिचय दिला होता.
ईश्वर चिठ्ठि प्रमाणे शंभर रुपयांचे लक्की ड्रा तिकीटांवर सलोन चेअर विठ्ठल गोरकर यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरोजताई चांदेकर व प्राचार्य निवृत्ती पिस्तूलकर, प्रास्ताविक महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे यांनी तर आभार चंद्रकांत नक्षीने यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करीता आयोजक दीलीप वनकर, अभय नागतुरे, तेजस नक्षिणे, गणराज नक्षिणे, जितेंद्र घुमे, विठ्ठल हनुमंते, मनोज चौधरी, शंकर शेटे, अजय डांगे, आकाश जांभुळकर, चंद्रकांत नक्षीने, अमोल ठमके आदींचा मोठा सहभाग होता.


0 टिप्पण्या