राजनकर परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर !
सहज सुचलं व मनस्वी व्हाॅट्सअप गृपच्या सदस्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली!
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे , सेवानिवृत्त शिक्षक व धामणगाव येथील मुळ निवासी नानासाहेब राजनकर यांचे काल सोमवारी सायंकाळी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षाचे होते.
गत काही महिन्यांपासून ते आजारी होते.दरम्यान त्यांच्यावर अमरावती, नागपूर व धामणगाव येथील तज्ज्ञ डॉ.मंडळींकडून नियमित उपचार सुरू होते.
परंतू काल कुठल्याही उपचाराला प्रतिसाद न देता त्यांची संध्याकाळी कायमची प्राणज्योत मालवली.
एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची अमरावती जिल्ह्यात ख्याती होती.
एका खासगी शिक्षण संस्थेतून त्यांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य (सेवानिवृत्त होत पर्यंत) केले.
त्यांना तीन मुले अभियंता आशिष राजनकर (नागपूर,)डॉ.प्रशांत राजणकर नागपूर, श्रीकांत राजनकर( महसूल विभागात अव्वल कारकून, धामणगाव) व एक कन्या योगिता हायगुणे शिक्षिका (चंद्रपूर)आहेत.
दिवंगत नानासाहेब यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासोबतच त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले.
अतिशय शांत स्वभावाच्या दिवंगत नानासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात असतांनाच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सदैव त्यांनी प्रयत्न केले. एवढेच नाही तर शाळेचा विद्यार्थी गुणवंत यादीत झळकवा यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांचे हातून घडलेले कित्येक विद्यार्थी आज शासकीय नोकरीत असल्याचे बघावयास मिळते.
दिवंगत नानासाहेब यांचे मागे तीन मुले,एक मुलगी , पत्नी सरलाताई राजनकर व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सहज सुचलं व मनस्वी व्हाॅट्सअप गृपच्या सदस्यांची भावपूर्ण श्रद्धांजली!
नानासाहेब राजनकर यांच्या दुःखद निधनाची बातमी कानावर पडताच अनेकांनी दुःखवटा व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.दरम्यान महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवार व मनस्वी व्हाॅट्सअप गृपच्या पदाधिकारी व सदस्यांनी दुःखवटा व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली!
आमचे एक मार्गदर्शक हरपले -किरण घाटे
वेळोवेळी सहकार्य करणारे नानासाहेब राजनकर यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकताच आम्हाला मोठा धक्का बसला ते आमचे एक मुख्य मार्गदर्शक होते अश्या शब्दात चंद्रपूरचे किरण घाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत दिवंगत नानासाहेबांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.
राजनकर परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर!
नानासाहेब राजनकर यांच्या जाण्याने राजनकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ते राजनकर कुटूंबातील एक
आधारस्तंभ होते .


0 टिप्पण्या