वेतन द्या- अन्यथा कामबंद आंदोलन करु - राकेश नाकाडे यांचा इशारा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर:- महानगरपालिके अंतर्गत साधारण १६० कामगार नाली सफाईच्या कामावर आहेत . सदरहु नाली सफाईचे कंत्राट अमरावतीचे कंत्राटदार दीपक उत्तरादी यांच्या नावावर असून मागील तीन महिन्यांपासून हे सर्व कामगार वेतनापासून वंचित आहे. आज या सर्व कामगारांच्या परिवारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे, मुलांच्या शाळेची फी कशी भरावी हा प्रश्न निर्माण झालेला आहे, घरी राशन कसे आणावे हा सुद्धा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.हे सर्व कामगार आर्थिक कोंडीत अडकलेले आहेत .
याबाबत महानगरपालिकेचे आयुक्त अकनुरी नरेश यांना भारतीय कष्टकरी जनसंघाचे राज्य उपाध्यक्ष राकेश नाकाडे व संघटनेचे पदाधिकारी यांनी दि. ३ फेब्रुवारी २०२६ ला निवेदन देऊन येत्या १० फेब्रुवारी पर्यंत सर्व कामगारांचे पगार तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यास कंत्राटदाराला आदेशित करण्याकरिता विनंती करण्यात आली.१० फेब्रुवारी २०२६ पर्यंत कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांचे खात्यात जमा न झाल्यास १२ फेब्रुवारी २०२६ पासून हे सर्व कामगार महानगरपालिकेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे .



0 टिप्पण्या