चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज : येथील महावीर पथावरील रुपाली मशिनरी कंपनी व रुपाली पाईप्स या दुकानास आग लागून सुमारे ८१ लाखाच्या मशिनरी व इतर साहित्यासह तेथे ठेवलेल्या दोन वाहने आगीत जळून खाक झाली तर शेजारील आयडीएफसी फस्ट बँकेचेही इसवीसह काही साहित्य जळाले आहे. मात्र तेथे राहणाऱ्या चौघाजणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोहन गांधी यांनी दिलेल्या जबाब वरून, रुपाली मशिनरी कंपनी व रुपाली पाईप्स त्या दुकानात पहाटे आग लागली. या आगीत दुकानातील सुमारे ३० लाख किंमतीच्या १२० इलेक्ट्रिक मोटरी शेतीपंप, पाच लाखांच.या सबमर्सिबल केबल्स, ३ लाखांच्या कांडप मशीन पिठाची गिरणी, दहा लाखाच्या पीव्हीसी पाईप फिटींग साहित्य चार लाखाची इलेक्ट्रिक मोटर साहित्य, आठ लाखांची शेतीची खते, १५ लाखाचे संसारपयोगी साहित्य व पाच लाखाचे होंडा सिटी कार व दोन दुचाकी वाण यास सुमारे ८० लाख ९० हजाराचे साहित्य जळून खाक झाले आहे.
त्याचबरोबर शेजारील आयडीएफसीफस्ट बैंकेचे फर्निचर, शटर, एसी, सीसीटीव्ही बोर्ड मिटर, सेक्युरीटी सिस्टीम वगैरे सदर आगीत जळुन नुकसान झालेले आहे. धन्यकुमार उपाद्धे यांची बुलेट व इ.एफ. को कंपनीची तीन चाकी रिक्षा असे सदरचे आगीमध्ये जळुन नुकसान झालेले आहे.



0 टिप्पण्या