चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : तुमसर तालुक्यातील तुडका येथे, भारतीय शाहीर कलाकार मंडळ नागपूर च्या वतीने, शाखा तुमसर/ मोहाडीच्या संयुक्त विद्यमाने, तालुकास्तरीय दोन दिवशीय कलाकार मेळावा दिनांक-1 फेब्रुवारी/2 फेब्रुवारी 2026 हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा अबोध भजन मंडळाच्या सुप्रसिद्ध गायिका नीलकमल गोंडाने यांना पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक संघटनेचे पदाधिकारी समस्त गावातील नागरिक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या