Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा गटात व हंडरगुळी गणात हायटेक प्रचार,वंचित फॅक्टर निर्णायक


 
प्रचारासाठी मोठ्या बलूनचा उपयोग केला जातोय


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-३ दिवसाच्या दु:खवट्या नंतर जि.प.व पं.स.समिती निवडणुक प्रचार सुरु झाला असून यंदाच्या निवडणुकीत सर्वच उमेदवाराने हायटेक प्रचार यंञणेवर जोर दिला असल्याचे दिसते.तसेच या निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकर गटाची भुमिका अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण,लातुर म.न.पा.च्या निवडणुकीत वंचितमुळे बहूमत मिळवूनही महापौर व उपमहापौर निवडणुकीत वंचित आघाडीला म्हत्व दिले नसल्याने वंचितच्या नेत्याने या जि.प.व पं.स. निवडणुकीत इंदिरा काॅंग्रेस सोबत युती नाही.तसेच इं. काॅंग्रेसने प्रचार साहित्यांवर प्रकाश आंबेडकरांचा फोटो वापरु नये,असे पञकार परिषदेत सांगितले आहे.तरीही काॅंग्रेवाले प्रकाशजी आंबेडकर यांचा फोटो बॅनरवर लावला आहे.म्हणुन वंचितचे बहूतांश कार्यकर्ते तसेच मतदार इंदिरा काॅंग्रेस विरोधात प्रचारात फिरत असल्याचे बघून हा फॅक्टर काय कमाल करणार?हे ९ फेब्रूवारीला कळेलच.
पुर्वी कोणत्याही निवडणुका असल्या की भींती रंगवले जायचे.तसेच पारावर,चावडीवर निवडणुकीच्या गप्पाटप्पा व्हायच्या.परंतू,इंटरनेटच्या या हाय फाय जमान्यात जि.प.व पं. स.निवडणुकीचा सध्याचा प्रचार एकदम हायटेक झाला असून उमेदवारांचे चाहते मोबाईलवर जय हो,आमचा नेता लई पाॅवरफुल,तुम्ही मार्केट केलंय जाम या सारख्या गाण्यावर उमेदवार व चिन्ह एडिट करुन सोशल मिडियावर धुरळा उडवून दिल्याचे दिसते.
*हाळीहंडरगुळीकर इं.काॅं.ला हाबाडा देणार?कारण सलग १० वर्षे निवडुन येऊनही इं.काॅं.च्या उमेदवाराने या गावात एकही चांगली योजना राबविली नाही.म्हणून या गटात खरे "कल्याण" झाले कुणाचे?याची खमंग चर्चा होत असून मतदारवर्ग कमळ फुलवायच्या आणि इं.काॅं.ला जोर का झटका धीरे से द्यायच्या तयारीत दिसतात..*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या