मौजे रुई येथे घरात छापा मारून देशी दारूच्या चाळीस बाटल्या पकडल्या
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-पोलीस उपमाहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत हातभट्टी दारू विक्री अवैधरित्या देशी दारू विक्री अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया सुरू असून त्या अंतर्गत मौजे रुई येथील एका घरात छापा मारून देशी दारूच्या अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेल्या चाळीस बाटल्या जप्त केल्याची घटना दि 17 रोजी रात्री 9.00 वाजता घडली आहे
पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतः अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शासकीय वाहनाद्वारे पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाल्याने एक नागरिक रुई येथे आपल्या राहते घरी देशी दारु बॉबी संत्राचे बॉटल्या बाळगुन तिची चोरटी विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाल्यावरुन 6:30 वा. चे सुमारास छापा मारला असता सदर ठिकाणी एक इसम आपल्या घरासमोर मिळुन आला, त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव खंडु लोडबाजी धबडगांवकर वय 44 वर्ष व्यवसाय मजुरी रा. रुई ता.माहुर जि.नांदेड असे असल्याचे सांगितले दोन पंचासमक्ष सदरील इसमाच्या घराची घरझडती घेतली असता घरामध्ये उत्तर कोपऱ्यालगत भिंतीच्या बाजुला एक प्लास्टीक व त्यामध्ये देशी दारु बॉबी संत्राचे 90 एम एल क्षमतेच्या एकुण 80 बॉटल्या प्रती बाटलीची किमत 40/-रु देशी दारू बाटल्यांचा 3200 रु चा माल मिळून आला
बेकायदेशीर व विनापरवाना आपल्या ताब्यात देशी दारु बॉबी संत्राचे 90 एम एल क्षमतेचे एकुण 80 बॉटल्या किमती 3200/-रु.चा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन मिळुन आला म्हणून सदर आरोपी विरुध्द गुन्हा कलम 65 (ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे पो का पवन राऊत यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि बाबू जाधव पो हे का प्रकाश गेडाम होमगार्ड सलमान खान राहुल राठोड दिलीप जाधव हे करत आहेत


0 टिप्पण्या