Ticker

6/recent/ticker-posts

माहूर येथे २२ फेब्रुवारी रोजी भिम महोत्सवफैजान ताज नागपूर व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका मंजुषाताई शिंदे यांचे भिमगीतांचा मुकाबला

चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर- त्यागमूर्ती रमाई माता यांच्या जयंती निमित्य  माहूर येथे दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भिम महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 युवा उद्योजक सिद्धार्थ उमरे छत्रपती संभाजीनगर, यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.  कार्यक्रमास रमाई माता यांच्या भाची शुभांगीताई धोत्रे  यांची  विशेष  उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश गायकवाड हे असून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात आर्णी चे नगराध्यक्ष नालंदा भरणे व किनवट नगराध्यक्ष प्रतिनिधी सुरज एंड्रलावार यांचे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. बौद्धाचार्य प्रा. डॉ. उतम शेंडे यांचे रमाईचा संघर्ष या विषयावर व्याख्यान होणार असून साहेबराव कांबळे उमरखेड आशिषभाऊ शेळके किनवट, देवेंद्र मुनेश्वर महागाव, मारोती मुनेश्वर नगरसेवक किनवट, शांतीदूत मुळे महागाव सुभाष लंबे यवतमाळ महेंद्र मानकर यवतमाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दि.२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ :०० वा. स्मृतिशेष शशिकलाबाई रघुनाथ मुळे विचारमंच बुद्धभूमी परिसर माहूर येथे संपन्न  होणाऱ्या या सोहळ्यात  माता रमाई यांच्या जीवन गातेवर नृत्य सादर होणार आहे.तसेच भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ जिल्हा पूर्व समता सैनिक दल यवतमाळ बटालियन तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला मानवंदना दिली जाणार आहे.  महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कव्वाल फैजान ताज नागपूर व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका मंजुषा ताई शिंदे पुणे  यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार वैचारिक मुकाबला होणार आहे या सोहळ्यास  विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंत उपस्थित राहणार असून या वैचारिक मेजवानी व प्रबोधनाचा बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन भिम महोत्सवाचे प्रमुख संयोजक आकाश कांबळे, अर्जुन बरडे यांनी केले आहे.  कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या