Ticker

6/recent/ticker-posts

रोझ अस्तर सोसायटी पुनावळे येथे अति उत्साहात शिवजयंती साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुनावळे:- 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गायकवाड नगर येथील जी के रोझ अस्तर सोसायटीत मोठ्या उत्साहात शिव जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीतील उत्सव समितीच्या अथक परिश्रमाने हे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी या सोसायटी मध्ये शिवजयंती खूपच मोठ्या दिमाखात साजरी होताना दिसली. कार्यक्रमात मोठी विविधता दिसून येत होती.
प्रथमतः शिव प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी सोसायटीचे उत्सव कमिटी सदस्य तसेच सोसायटीतील सन्माननीय ज्येष्ठ नागरिक - पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीतील बालगोपालांच्या लेझीमच्या साथीने महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर  शिवजन्माचा पाळणा येथील ज्येष्ठ महिलांनी सदर केला. पोवाडा चालू असताना त्या सोबत शिव चरित्रावर आधारित असा रोमहर्षक प्रसंग सादर करण्यात आला. या व्यतिरिक्त महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे, कविता, गाणी सादर करण्यात आली.  लहान लहान मुलांचे दमदार लेझीम पाहून ती प्रेरणा घेऊन येथील तरुण महिलांनी सुद्धा लेझीम अतिशय सुंदर तऱ्हेने सादर केले. 
या शिवाय आणखी बरेच कार्यक्रम सादर झाले.  या साऱ्यांचे अगदी योग्य असे सूत्र संचालन श्री बालाजी जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन,  बक्षीस वितरण, शेवटी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती.
   या कार्यक्रमाला यशस्वीच्या शिखरावर पर्यत पोहचविण्यात सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र मोहाते, सचिव अभिषेक तन्नू याचे मार्गदर्शन, तसेच उत्सव समितीचे भगवती अण्णा, संदीप मगर, पराग चौहाण, बालाजी जाधव, नरेंद्र जाधव, शेट्टे, रोहित कोल्हे, इत्यादीकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच ज्येष्ठ नागरिक विनायक हुगेवार, सतीश भालेराव, अशोक वस्तानी, गोविंदप्रसाद झुंजूनवाला, नन्दन मिठारी, इत्यादी  तसेच ज्येष्ठ महिला मध्ये सौ. संगीताताई भालेराव, करुणा वस्तानी, सुषमा जोशी, भारती वडगावकर, उषा राजमाने, संगीता मगर, वर्षाताई हुगेवार, राजश्री घोडके, सुशीला मोरे, इंदिरा रेलन, इत्यादी महिलांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिश्रम घेतल्याने कार्यक्रमाला अभूतपूर्व यश प्राप्त झाले 

अतिशय उत्तम रीतीने असा हा शिवजयंती सोहळा या भागात प्रथमच दणक्यात साजरा झाल्याने या कार्यक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या