चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-नुकत्याच संपन्न झालेल्या जि.प.पं.स. निवडणुकीत वाढवणा गटासह हंडरगुळी व वाढवणा पं.स.गणावर लातुर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्ते यांचे लक्ष लागले होते.
कारण,या गटात २०१२ व २०१७ असे सलग दोन टर्म इं.काॅं.पक्ष (हाळीचा व्यक्ती) जिंकला होता.म्हणुन काॅंग्रेचा मजबुत गट म्हणुन ओळखला जायचा.पण हा गट व २ ही गण ताब्यात घेण्यासाठी आणि वाढवणा गट काॅंग्रेस मुक्त करण्यासाठी महायुतीने विशेषत: हाळीसह गटातील सामान्य मतदारांनीच ही जि.प.निवडणुक हातात घेतली आणि मी म्हणजेच काॅंग्रेस असे म्हणत मतदारांना ग्रहीत धरणा-या तसेच गत १० वर्षात गटाचे 'कल्याण' न करणा-या काॅंग्रेसचा एककीकडे एकही उमेदवार विजयी न करता मतदारांनी काॅंग्रेसमुक्त जि.प. वाढवणा गट केला आहे.तर दुसरीकडे याच गटातील पं.स. वाढवणा गणातील मतदारांनी भाजप व काॅंग्रेस या राष्ट्रीय पक्षाला तिस-या व चौथ्या स्थानी ढकलले.आणि अपक्ष सौ.सुरेखा भांगे (भोसले) या हंडरगुळीतील 'भोसले-पाटील' घराण्यातील लेकीला विजयी केले.तसेच हंडरगुळी गणात 'भोसले-पाटील' घराण्यातीलच विक्की भोसले-पाटील(भाजप) या मुलाला बहूमताने विजयी केले.म्हणुन मतदारांनी यावेळी हंडरगुळी येथील २ दोन उमेदवारांना ते पण 'भोसले' घराण्यातील सौ.सुरेखा भांगे (भोसले) वाढवणा पं.स.अपक्ष तसेच विक्की भोसले हंडरगुळी पं.स.भाजप या भावंडांना विजयी केले आहे.
मतमोजणीच्या पहिल्या कांही फे-यांमध्ये हंडरगुळी गणातील काॅंग्रेसचा उमेदवार चक्क तीन नंबरवर होता.हे विशेष...!


0 टिप्पण्या