चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-परवाच झालेल्या जि.प.व पं.स.निवडणुकांचे निकाल लागले.त्यात पडणारे पडले, जिंकणारे जिंकले.
माञ,लोकशाहीत जनमत हा नेहमीच शिरसावंद्य मानला जातो. निवडुन आला तोच नेता,हे विजयी व्यक्तीं बद्दल म्हटले जात असले तरीही यंदाच्या निवडणुकीत एका नव्या चर्चेला सुरुवात झाली.ती चर्चा म्हणजे गत १० वर्षात वाढवणा गटात कुण्या गावाचे, कुण्या व्यक्ती चे "कल्याण" झाले?आणि ही चर्चा २२,२३ जानेवारी पासून आजतागायत सुरुच आहे.आणि याला कारण ही तसेच आहे.ते म्हणजे हा गट सलग २ टर्म काॅंग्रेसचा अभेद्य गड राहीला.आणि या २०२६ च्या निवडणुकीतही राहिल व हॅटट्रिक करील.अशी पक्की खाञी स्व:ताचे 'कल्याण' करुन घेणा-याला व काॅंग्रेस समर्थकांना होती.पण समर्थकांना हे माहिती नव्हते की,काॅंग्रेसतर्फे गत २ टर्म जिंकलेल्यांनी गटामध्ये काय, काय दिवे लावलेत?
व किती गावांचे व लोकांचे "कल्याण" केलेत?
तसेच जमिनीवर किती आणी हवेत किती?चाललेत. जि.प.सदस्य हे पद जनसेवे साठी असते.परंतू,गत दहा वर्षात हे पद जनसेवेऐवजी 'मेवा' खाण्यासाठीच तयार केल्याचे चिञ वाढवणा गट व हंडरगुळी गणात दिसत होते.
परंतू राजकीय क्षेञातुन लोकांच्याच 'कल्याणासाठी' तसेच विकासासाठी राञंदिवस झटणा-या "राम" ने माञ श्रेष्ठींनी टाकलेला विश्वास मतदारांच्या पाठींब्यामुळे सार्थ ठरविला. आणि गत ३४ वर्षात प्रथमच वाढवणा गटावर महायुतीचा ध्वज मोठ्या अभिमानाने रोवला. या निवडणुकीत पडणारे पडले, जिंकणारे जिंकले असले तरीही गत१०वर्षात कुणाचे "कल्याण" झाले ? ही चर्चा २२,२३जानेवारी पासून आजही जोरदारपणे सुरुच आहे.तसेच यावेळेस मतदारांनी "परदेशी" ला "व्हॅल्यू" न देता,कर्तत्वाची जाण ठेवुन रुग्णांची सेवा हिच ईच्छ सेवा. असे समजुन समाजसेवा करणा-या 'राम' ला विजयी केल्यामुळे वाढवणा गटावर प्रथमच महायुतीच्या तिरुकेंचा "चंद्र" कोरला.असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.


0 टिप्पण्या