Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संयुक्त अधिवेशन 21 ते 22 फेब्रुवारी 26 रोजी रत्नागिरी येथे आयोजन. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हीरक महोत्सवी, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे, 27 वे आणि रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 49 वे अधिवेशन दिनांक- 21 ते 22 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी जिल्हा संघ आणि स्व कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप ता.जिल्हा रत्नागिरी आयोजन केले असून, तिहेरी अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री - उदय सामंत यांच्या हस्ते दिनांक 21 फेब्रुवारी ला सकाळी 10. वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमाला नागपूर विभाग ग्रंथालय चालक, ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथ प्रेमींनी या तिहेरी  अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ग्रंथालय चळवळ वृद्धीगत करावे असे आवाहन ग्रंथालय चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते मिलिंद मेश्राम, गुरुदास डोंगरे, सागर लोंढे, नरेंद्र सहारे, मुकेश गजभिये, संजय नारनवरे, दीपक मोहोळ, प्रबोधनकार भिमशाहिर  तथा पत्रकार प्रदीप कडबे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या