Ticker

6/recent/ticker-posts

लाळ खुरकूत लसीकरण करून घेण्याचे पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत आवाहन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-लाळ खुरकूत लसीकरण मोहीम ही दि. 13/02/2026 पासून 29 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. 
लाळ खुरकूत रोग हा विषाणू जन्य संसर्ग जन्य रोग आहे. हा रोग एका पशुकडून दुसऱ्या पशुला होतो. या रोगात भरपूर ताप येतो, भुक मंदावते,  चारा पाणी खाता येत नाही, तोंडात व्रण पडतात, जखमा होतात, लाळ गाळतात, तब्येत खराब होते, जनावरं रोड होतं,  पायात जखमा होतात, गाभण गाई म्हशी गाभडतात,  पशु दगावतात. 
 हा रोग होऊ नये म्हणून पशुवैद्यकीय चिकीत्सालय हंडरगुळी मार्फत लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या लसीकरण मोहीमचा लाभ आडोळवाडी, वंजारवाडी, चिमाचीवाडी, मोरतळवाडी, रूद्रवाडी, आनंदवाडी, हाळी व हंडरगुळी या गावात राबविण्यात येणार आहे. 
तरी सर्व पशुपालकांनी लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अमरनाथ जी सोमवंशी यांनी केले आहे. तसेच ही लस 3 आठवड्याच्या वरील सर्व कालवडी , गोर्हे, गाई , म्हशी वगारी, हालगटं ( गाय वर्ग व म्हैस वर्ग) यांना देण्यात येणार आहे. असे श्री आर आर खतिब पशुधन पर्यवेक्षक व, उध्दवदादा माने, व तानाजी जोगपेटे परिचर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या