अखेर ४५ वर्षानंतर विनोद खोब्रागडे यांच्या संघर्षाने जिवती तालुक्यातील कुंसुबी येथील २४ आदिवासींना मिळाला. न्याय
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अखेर ४५ वर्षानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबी येथील २४ आदीवासीना ६३.६२ हे.आर. जमीनीचा व घरांचा मोबदला व एक नौकरी नुकतेच मिळाला आहे.
विनोद खोब्रागडे पटवारी, तथा सामाजिक कार्यकर्ते तथा RTI जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी सन २०१३ पासुन शासन प्रशासन यांना पाठपुरावा करीत होते.
शेवटी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे क्रिमीनल रिट पीटीशन नंबर ६५७/२०२१ दाखल केली. व नोटीस इशु झाले.
त्यानंतर विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या याचिके मध्ये कुंसुबीचे २४ आदीवासी यांनी सुद्धा सामिल झाले होते,मात्र ते गरीब असल्यामुळे एकही रुपया या दोन्ही जेष्ठ वकिल मंडळी यांना न देता मोबदला मिळाल्यानंतर देन्याचे कबुल केल्याचे सांगितले आहे.
वकिलांचा तसेच दस्तऐवजांचा व किरकोळ खर्च विनोद खोब्रागडे यांनी स्वतः आपल्या खिशातून आजपर्यंत केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांना विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या क्रिमीनल रिट पीटीशन नंबर ६५७/२०२१ मध्ये सदर कंपनीला व महसूल अधिकारी यांना कुंसूबीच्या २४ आदीवासीना मोबदला दिल्याचा पुरावा मागितला आणि कंपनी व महसूल अधिकारी एकमेका कडे पाहु लागली, कारण कंपनीने पैसेच दिले नसल्याचे आढळून आले.
कोर्टाने पुरावा मागताच सदर कंपनीने कुंसूबीचा २४आदीवासी शेतकऱ्यांना हाताशी धरून कमी प्रमाणात करारनामा नायब तहसीलदार जिवती सोबत करुन १० लाख प्रती हेक्टरी व एक लाख घरांचे, व नौकरी अशी तडजोड केली. व रक्कम भारतीय स्टेट बँकेत जमा केले आहे.
आज काही न्युज पेपरला जी बातमी प्रसिद्ध झाली त्यामध्ये रिट पीटीशन ४७३२/२०१८ लिहिले आहे. त्याचा कुंसूबीचा २४ आदीवासींशी कवडीचाही तिळमात्र संबंध नाही.
क्रिमीनल रिट पीटिशन ६५७/२०२१ दाखल करणारे विनोद खोब्रागडे हे कायदेशीर कोर्टात संघर्ष मागील अनेक वर्षांपासून करीत आहे, पुढील पेशी तारीख ९/३/२०२६ आहे.
अखेर ४५ वर्षानंतर विनोद खोब्रागडे यांच्या २०१३ पासुनच्या संघर्षा नंतर कुंसूबीचा २४आदीवासीना शेतजमीनीचा व घरांचा मोबदला मिळाला आहे.
या प्रकरणात आमदार, खासदार, मंत्री, किंवा लोकप्रतिनिधी, किंवा वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलिस अधिकारी यांच्या १% सुद्धा वाटा नाही, म्हणून विनोद खोब्रागडे पटवारी शिवाय कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे पत्रकारांशी बोलतांना पीटीशन दाखल करणारे विनोद खोब्रागडे RTI जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांनी सांगितले.


0 टिप्पण्या