चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-दरवर्षी कार्तिकी एकादशी उजाडताच शुभमंगलची धूम सुरु होते.अशी जनतेची जणवाणी आहे.
माञ,यंदा व्हॅलेंनटाइन महिण्यात शुभ विवाहाचे १२ मुर्हूत आलेत.
धर्मशास्ञ,जोतिष्य आणि सामाजिक परंपरा यांचा सुंदरसा मिलाप साधणारा दिवाळी नंतरचा काळ हा वर्षातील सर्वात चांगला मानला जातो. चार्तुमासाची समाप्ती,कार्तिकी एकादशी चा पविञ दिवस आणि नक्षञांचे अनुकूल योग यांच्या ञिवेणी संगमामुळे शुभमंगल सोहळ्यांना याच काळात रितसर सुरुवात होते.
गत २ नोव्हेंबर पासुन शुभ विवाहाचा मोसम सुरु झाला असून आजकाल व्हॅलेंटाइन चा महिना म्हणुन फेमस झालेल्या फेब्रूवारीत यंदा शुभमंगलचे एकुण १२ मुर्हूत आले आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशी पासून सुरुहोणारा चार्तूमास हा देवांच्या आरामाचा काळ मानला जातो.या४महिण्यात विवाह, घरप्रवेश,नामकरण यासारखी मंगलकार्ये पार न पाडण्याची परंपरा आहे.
अश्विन अमावस्येनंतर कार्तिक शुध्द प्रतिपदेपासून सुरु होणारा १५ दिवसांचा काळ हा सात्विक व मंगल मानला जातो. दिपावलीनंतर सर्वात म्हत्वाचा म्हणजे देवउठणी (कार्तिकी) एकादशी या दिवशी भगवान विष्णु योगनिद्रा सोडून जाग्रत होतात.यानंतरच शुभ विवाह,मुंज,घरप्रवेश,नामकरण इ. कार्यांना शास्ञियआधाराने मान्यता मिळते.आणि यंदा फेब्रूवारी म्हणजे व्हॅलेंटाइन २०२६ मध्ये ३,५,६,७,८,१०, ११,१२,२०,२२,२५,२६ या तारखांना विवाह मुर्हूत आले असल्याने या वर्षी व्हॅलेंनटाइन दरम्यान विवाह समारंभाचा धडाका उडेल.हे माञ नक्की.


0 टिप्पण्या