Ticker

6/recent/ticker-posts

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कामगार संघटना आयटकचा देशव्यापी आंदोलन - हडताल शंभर टक्के यशस्वी



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : - येथील 12 फरवरी ला आयटक  ( a i t u  c ) - आल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कामगार विरोधी धोरणा विरोधात तहसील कार्यालय परिसर भद्रावती येथे दुपारी 1  ते 4 वाजे पर्यंत भव्य धरणा निदर्शने करून राजेश भांडारकर तहसीलदार  यांना निवेदन देऊन तहसीलदार याचे मार्फत राष्ट्रपती - पंतप्रधान - राज्यपाल - मुख्यमंती आयुक्त - जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर प्रमुख मागण्या विषयी चर्चा करण्यात आली  
कॉम्रेड राजू एम गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक 
आयटक यांच्या नेतृत्वात  आंदोलन घेण्यात आले 
सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे आणि नवीन आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनाची शक्ती खिळखीळी झाली आहे देशातील सर्व कामगारांनी लढून मिळवलेले सर्व कायदे बासनात गुंडाळले जात आहेत सन 1920 ते 1947 दरम्यान देशात अनेक कायदे निर्माण झाले आणि या सर्व लढ्यामध्ये कामगारांचा सहभाग मोठा होता याचा आयटक ला अभिमान आहे आयटक संघटनेने सर्व केंद्रीय कामगार संघटना कृती समितीने पुकारलेला संप - हडताल शंभर टक्के यशस्वी करण्यात आला 

प्रमुख मागण्या : -- (1) केंद्र सरकार द्वारा लागू श्रमिक विरोधी चार श्रम संहित त्वरित मागे घेऊन या संहिता लागू करणे संबधी दिनांक 21नोव्हेंबर 2025 रोजी अचानक जरी केलेली अधिसूचना रद्द करा  ( 2 ) सामान काम सामान वेतन लागू करा ( 3 ) खाजगीकरण व व्यापारीकरण बंद करा ( 4 ) महागाई व दरवाढ कमी करा ( 5) राज्य शासनाकडे प्रलंबित आशा वर्कर -- अंगणवाडी कर्मचारी - शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करा  ( 6 )  स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या व इतर मागण्या 
या संपात वेकोली ( डब्यु सी एल )-  आयुध निर्मानी डिफेन्स ( ओ एफ सी ) - पोस्ट आफिस - बँक - एल आ सि (भारतीय बिमा निगम ) - रेल्वे - शालेय पोषण आहार कर्मचारी - आशा वर्कर -  अंगणवाडी - बालवाडी - शासकीय - निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले होते 
शासनाने पोलीस पोलीस बंदोबस्त तगडा ठेवला होता 
या देशव्यापी संपात  कॉ राजू गैनवार  - कॉ अरविंद कुमार कॅप्टन - कॉ शकील शेख  - कॉ नसरीन खा पठाण - कॉ लता देवगडे  - कॉ बंडू डोंगे - कॉ माला गायकवाड - कॉ रत्नमाला खडसे -  कॉ मनीषा मत्ते - कॉ वंदना बेलूरकर -कॉ शारदा सिडाम - कॉ सुरेश बावणे - कॉ नाणेबाई बोबडे  - इत्यादिनीं आंदोलनात सहभागी झाले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या