Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड 2026’ साठी आनंद निकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्याची निवड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी  रुपेश पांडुरंग कुतरमारे या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड 2026’ साठी निवड झाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पणजी, गोवा राज्यात करण्यात येणार असून,दिनांक 5 एप्रिल 2026 हा सोहळा सर्किट बेंच डी.एस. राठोड फाउंडेशन व शांतिदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

सदर विद्यार्थ्याने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, ग्रामस्वच्छता, जनजागृती मोहीम तसेच गरजू घटकांसाठी विविध सेवा उपक्रमांचा समावेश आहे. समाजहिताच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळेच त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

विद्यार्थ्याच्या या यशामुळे महाविद्यालयाचे तसेच परिसराचे नाव उज्ज्वल झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणास्थान ठरत आहे. त्याच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे.

या यशाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, कार्यक्रमाधिकारी सुरेश राठोड, कार्यक्रमाधिकारी डॉ. धनश्री पाचभाई, प्रा. मोक्षदा नाईक, डॉ. रंजना लाड, डॉ. नरेंद्र पाटील, काळे  आणि चौधरी  तसेच वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख आणि शिक्षकवृंद यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या