चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या रिक्त असलेल्या 484 जागा वित्त विभाग उपसमितीची मान्यता घेऊन एमपीएससी कडे पाठवण्यात याव्या व मागील दोन वर्षापासून एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना.श्री. जयकुमार (भाऊ) गोरे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.
राज्यसेवा व कृषीसेवेची तयारी करणारा विद्यार्थी मागील दोन वर्षापासून एमपीएससीची तयारी करत आहे, परंतु गेल्या दोन वर्षापासून कृषी सेवेतील पदांना वित्त विभाग उपसमितीची मान्यता न मिळाल्यामुळे कृषी अधिकारी पदाच्या जागा जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे कृषी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत प्रस्तावित 484 जागांना वित्त विभाग उपसमितीचे मान्यता देऊन संबंधित जागा लवकरात लवकर एमपीएससी कडे पाठवण्याबाबत सकारात्मक हस्तक्षेप करावा अशी मागणी निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेबांचे चिरंजीव आदित्यराज जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते.


0 टिप्पण्या