चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर :-दिनांक १० मार्च २०२६ ला ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन डॉ प्रफुल्ल खुजे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी आयोजित केले होते.ऊप जिल्हा रूग्णालय येथे गरोदर मातांना तपासणीचा दिवस याचे औचित्य साधून वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी गरोदर मातांसाठी खास या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला गरोदर मातां लाभार्थी त्यांचें नातेवाईक सासू आई बहीण ननद हे हजर होते.गरोदर मातांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व फ्लारेंन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यामध्ये प्रतिक्षा पडोळे अधिपरीचारीका यांनी केअर काॅम्पीयन कार्यक्रमाची माहिती दिली.वंदना बरडे अधीसेवीका यांनी १०८ , गर्भसंस्कार,१००० दिवसांचे महत्त्व व पुर्वीच्या महीला व आताच्या महीला मधील फरक समजावून सांगितला.आणी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन कल्याण कस्तूरे व आभार प्रदर्शन कांचन सातपुते अधिपरिचारीका यांनी केले.कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या