Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर ग्रंथोत्सव 6 मार्च ते 7 मार्च 2026 रोजी कार्यक्रमाचे आयोजन. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते होणार उद्घाटन.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर, वसंतराव नाईक शासकीय कला समाज विज्ञान संस्था नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने, 6 मार्च / 7 मार्च 2026 रोजी नागपूर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून वित्त आणि नियोजन राज्यमंत्री एडवोकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8 वाजता ग्रंथ पूजन, व ग्रंथ दिंडीच्या शुभारंभ होणार आहे. 11 वाजता राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. शनिवार 7  मार्च रोजी पहिल्या सत्राय ए आ य काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रसे न जी त गायकवाड, डॉक्टर अरुधंती वैद्य सफि पठाण, विजय सावंत, साहित्यिक सहभागी होणार आहेत. या ग्रंथोत्सहाचे मुख्य आयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर मीनाक्षी कांबळे, सदर कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील ग्रंथालय संचालक ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथ प्रेमी, या ग्रंथोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान प्रबोधनकार भिमशाहिर पत्रकार प्रदीप कडबे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या