Ticker

6/recent/ticker-posts

नगरसेवक कमल साठवणे यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : – प्रभाग क्रमांक १ अंतर्गत शिवजी वॉर्ड, शुक्रवारी येथे नगरसेवक तथा गटनेते, नगर परिषद भंडारा कमल धनराज साठवणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविणे, शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि वॉर्डातील विकासकामांना गती देणे या उद्देशाने या जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
उद्घाटन प्रसंगी भंडारा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक धनराज साठवणे प्रमुख उपस्थित होते. तसेच माजी अध्यक्ष भंडारा जिल्हा दूध संघ रामलाल चौधरी, किशोर राऊत, नरेशचंद्रजी कवडे, भाऊराव येळणे, नरेंद्र साकोरे, नाथूजी खंडाईत, रुपचंद नागपुरे, स्नेहा भावटे, ज्योती बावनकुळे, पिंटू नागपुरे, बागडे जी, फारूक शेख, नरेशजी जिभकाटे, हिरामनजी लांजेवार, तरुणकुमार भावटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कमल धनराज साठवणे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले व जनतेच्या हितासाठी सुरू करण्यात आलेले हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी लाभदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान फित कापून व पूजन करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांनी विकासकामांबाबत चर्चा केली. वॉर्डातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी त्वरित नोंदवून त्यावर कार्यवाही करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या