चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत लातूर विभागीय मंडळ यांच्या वतीने सुरू असलेल्या परीक्षांसाठी माहूर येथील केंद्रात नव्या केंद्रसंचालकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले विद्यालय, अंजखेडचे प्रा. प्रवीण रंगराव बिरादार यांची केंद्रसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे विभागीय मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
नायब तहसिलदारांच्या पाहणीनंतर गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर तत्काळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व शिस्त अबाधित राहावी, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली असून यासंदर्भातील आदेश दि. २६ फेब्रुवारी रोजी विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ यांनी निर्गमित केल्याची माहिती अधिकृत पत्रातून देण्यात आली आहे.


0 टिप्पण्या