चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड:-विधानसभा सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महा यूवती सरकार ने वचनपूर्ती
२०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात गरीब, शेतकरी, महिला आणि तरूणी व तरुणांसाठी अनेक आश्वासने दिले पण महाराष्ट्रातील शेतकरी राजा सह तरुण-तरुणी वयोवृद्ध पुरुष माता भगिनी दिव्यांग विद्यार्थी लक्षणी भगिनी जनतेची या सह दिशा बोल तथा फसवणूक केली आहे हे नाकारता येत नाही
कारण निवडणुकीच्या दरम्यान दिलेले खालील प्रमाणे अशी आश्वासन आहेत
*जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने:*
- *लाडकी बहीण योजने*: महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन
- *वृद्ध पेन्शन*: वृद्ध पेन्शन धारकांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन
- *शेतकऱ्यांची कर्जमाफी*: शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन
- *रोजगार निर्मिती*: २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन
- *अंगणवाडी आणि आशा सेविकांना*: दरमहा १५ हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन
- *ग्रामीण भागात विकास*: ४५ हजार गावांमध्ये पांधण रस्ते बांधण्याचे आश्वासन
- *शिक्षण*: दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये शिक्षणासाठी देण्याचे आश्वासन
- *आकांक्षा केंद्र*: आकांक्षा केंद्र स्थापन करून दहा लाख उद्योजक घडवण्याचे आश्वासन
- *लखपती दीदी*: ५० लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आश्वासन असे अनेक आश्वासने मागण्या जनतेच्या प्रलंबित आहेत सरकारमधील या मतदारसंघातील आमदारासह सर्व उदासीनता दिसून येत आहे आणि याचा परिणाम थेट जनतेवर होत आहे जनता जनार्दन या निर्णयावर नाराज असल्याचे
शेतकरी पुत्र जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गजानन पाटील चव्हाण या बाबीवर नाराजी व्यक्त करून लोकनेते ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा महाराष्ट्र पैटल्याशिवाय राहणार नाही असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे


0 टिप्पण्या