चित्रा न्युज प्रतिनिधी
करमाळा – महाराष्ट्रातील महान समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारक आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचा दिवस महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रीय दिनांच्या यादीत समाविष्ट करावा, अशी मागणी मातंग एकता आंदोलन तथा लहुजी फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेल व्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे हे समाजातील वंचित घटकांसाठी लढणारे महान समाजसुधारक होते. त्यांनी समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मोठे योगदान दिले.
इ.स. 1822 मध्ये पुणे येथे त्यांनी युद्धकलेचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करून अनेक तरुणांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्रांतिकारक घडले. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, यांसारख्या समाजसुधारकांवरही त्यांच्या विचारांचा प्रभाव होता. आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे कार्य केले असून त्यांच्या कार्यामुळे समाजात जागृती निर्माण झाली. त्यामुळे त्यांची जयंती १४ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने राज्याच्या राष्ट्रीय दिनांच्या यादीत समाविष्ट करून अधिकृतपणे साजरा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचा सकारात्मक विचार करून शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अध्यक्ष युवराज जगताप यांनी व्यक्त करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या