Ticker

6/recent/ticker-posts

महिला पतंजली योग समितीतर्फे भंडारा जिल्हा कारागृह येथे महिला बंदीसाठी मोफत दंत चिकित्सा तपासणी शिबिर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पतंजली तर्फे भंडारा जिल्हा कारागृह येथे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन महिला पतंजली जिल्हा प्रभारी डॉ. वैशाली गिऱ्हेपुंजे यांनी केले त्यांच्यासोबत दंत चिकित्सक डॉ.शर्वरी तसेच डॉ.वैदेही उपस्थित होत्या. बंदिस्त असलेल्या महिला कैदयांचे दाताची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले ,सोबतच ओरल हायजिन किट टूथपेस्ट आणि ब्रश याचे वितरणही करण्यात आले.
डॉ. शर्वरी गिऱ्हेपुंजे यांनी दाताच्या आरोग्य आणि काळजी कशी घ्यायची यावर आणि डॉ. वैदेही गिऱ्हेपुंजे यांनी ब्रश कोणत्या पद्धतीने करायचं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी  जिल्हा कारागृह पोलीस अधीक्षक श्री जगताप सर यांनी पूर्ण सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या