Ticker

6/recent/ticker-posts

‘स्त्री सक्षमीकरण’ केवळ घोषवाक्याचा विषय नसून तो समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मूलभूत गाभा आहे-कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर

          
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :- स्त्री सक्षमीकरण हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून तो समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मूलभूत गाभा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून स्त्रीला मानाचे स्थान दिले गेले आहे. स्त्रियांचा सन्मान व समानता ही भारतीय परंपरेची ओळख असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी केले.
             प्रगती महिला समाज, व्दारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालय, भंडारा येथे जागतिक महिला दिनाच्या औचिताने आयोजित “स्त्री सक्षमीकरणातील प्रश्न व आव्हाने : वैदिक काळापासून समकालीन वैश्विक युगापर्यंत” या विषयावरील एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात महिलांनी शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, क्रीडा, साहित्य, कला आणि उद्योग या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महिलांच्या या प्रगतीमुळे समाजातील विकास प्रक्रियेला गती मिळत आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी महिलांना शिक्षणाची कमतरता, सामाजिक असमानता, आर्थिक मर्यादा आणि सुरक्षिततेसंबंधी समस्या यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. 
परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रगती महिला समाज संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री एम. देशकर उपस्थित होत्या. त्यांनी वैदिक काळात स्त्रियांना शिक्षण, विचारस्वातंत्र्य व समाजजीवनात सक्रिय सहभागाची संधी होती. गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषींच्या उदाहरणातून त्या काळातील स्त्रियांचे बौद्धिक सामर्थ्य दिसून येते. मात्र पुढील काळात विविध सामाजिक प्रथा व बंधनांमुळे स्त्रियांच्या प्रगतीला काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले. आधुनिक काळात शिक्षण, कायदे आणि सामाजिक जागरूकतेमुळे महिलांच्या सशक्तीकरणाला नवे बळ मिळत असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रशांत पुराणिक, प्राचार्य, शासकीय कन्या स्नातकोत्तर महाविद्यालय, उज्जैन, मध्यप्रदेश यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे परिषदेला संबोधित केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शामराव जे. कोरेटी, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा व इतिहास विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळाला तरी निर्णय घेण्याचा आणि आर्थिकतेचा अधिकार मिळाला का? असा सवाल उपस्थित केला. विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रदीप के. मेश्राम, कार्यकारी प्राचार्य, जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा यांनी महिला सक्षमीकरणावर सौद्धांतिक भूमिकेतून विवेचन केले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. रेखाताई देशकर, संचालक श्री. प्रशांत देशकर उपस्थित होते. परिषदेच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांनी परिषदेच उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी शोधनिबंधावरील पुस्तकाचे आणि महाविद्यालयाच्या 'उत्कर्ष' वार्षिकांकाचे विमोचन माननीय कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. तसेच वैद्यकीय शिक्षण घेत असलेली प्रगती जुनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी कु. मिमन्सा देशकर हिचा इंटरनॅशनल जर्नल मध्ये शोधनिबंध प्रकाशित झाल्यामुळे मा. कुलगुरूंचे हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटनसत्राचे संचालन डॉ. जयश्री संजय सातोकर यांनी तर उपस्थितांचे आभार समन्वयक डॉ. गजानन कळंबे यांनी मानले. परिषदेच्या माध्यमातून स्त्री सशक्तीकरणाच्या ऐतिहासिक, सामाजिक व समकालीन पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली.
          परिषदेचा तांत्रिक पहिल्या सत्रातील विषय “महिला सशक्तिकरण ऐतिहासिक ते समकालीन युगापर्यंत” असा होता. सदर सत्र डॉ. दीपक कापडे, ग्रंथपाल, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सत्रात डॉ. श्रीनिवास सातभाई, इतिहास विभाग प्रमुख,शासकीय विदर्भ महाविद्यालय, अमरावती यांनी भारतीय स्त्रियांची सामाजिक स्थिती तसेच भूतकाळ व वर्तमान या विषयावर विवेचन केले. तसेच डॉ. संतोष सुरडकर, सहाय्यक प्राध्यापक, इतिहास, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी  स्त्री सशक्तीकरणातील सामाजिक-सांस्कृतिक आव्हाने  या विषयावर विस्तृत  मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन प्रा. प्रफुल्ल देशमुख यांनी तर आभार डॉ. ज्ञानेश्वर हिवसे यांनी मानले. दुसऱ्या तांत्रिक सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. माधवी ए. मार्डीकर, प्राध्यापक, शारीरिक शिक्षण विभाग, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नागपूर यांनी भूषविले. या सत्रात ॲड. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या, गोंदिया यांनी स्त्रियांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा आढावा घेत, प्रत्येक क्षेत्रात तिने सक्षमतेने पुढे येण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भंडारा जिल्हा नगराध्यक्ष सौ. मधुरा मदनकर आणि नगरसेविका सौ. कुलप्रीत कवलजीतसिंग चड्डा यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन परिषदेच्या सचिव डॉ. किष्णा पासवान यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. जयश्री सातोकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाला सचिव सौ. रेखाताई देशकर, अध्यक्षा डॉ. जयश्री एम. देशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पेपर सादरीकरण सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. गोविंद तिरमणवार, विभाग प्रमुख, इतिहास, स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगाव पेठ, अमरावती यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रामकृष्ण टाले, प्राचार्य, बॅरिस्टर शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा, नागपूर व डॉ. राकेश कभे, सदस्य, मराठी अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व मराठी विभाग प्रमुख, महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय, पारशिवनी तसेच डॉ. सुनीता रंगारी, मराठी विभाग प्रमुख, एम. बी. पटेल महाविद्यालय, देवरी यांनी ‘गुणवत्ता पूर्ण संशोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले.  या सत्रात विविध संशोधक व विद्यार्थ्यांनी स्त्री सशक्तीकरणाशी संबंधित संशोधनपर लेखांचे सादरीकरण केले. सत्राचे संचालन डॉ. पलाश करकाडे यांनी तर आभार डॉ. शालिक राठोड यांनी मानले. समारोप सत्राचे अध्यक्षस्थान श्री. प्रशांत देशकर, सदस्य, महाविद्यालय विकास समिती व संचालक, प्रगती महिला समाज, भंडारा यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. देवेंद्र भोंगाडे, प्राचार्य, अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च सेंटर, देवग्राम, नागपूर व सदस्य, व्यवस्थापन परिषद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी परिषदेतील विषय आणि त्यावर झालेली चर्चा ही अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारी होती असे मत व्यक्त केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगताना, त्यांनी उच्च शिक्षण संस्थांची जबाबदारीही अधोरेखित केली. तसेच विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संशोधनाची वृत्ती विकसित करण्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. समारोपाचे संचालन समन्वयक डॉ. गजानन कळंबे यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांनी मानले. परिषदेत विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. एकदिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद उत्साहात व शैक्षणिक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रगती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अभिजीत लिचडे, डॉ. शुभांगी लोंदासे, डॉ. जोत्स्ना गजभिये, डॉ. शिल्पा बन्सोड, प्रा.सौ.अपर्णा लिचडे डॉ. डी. डी. चौधरी, श्री. संजय वानखेडे, श्री. दौलत नेवारे, श्री. मनीष देशकर, प्रांजली चवरे, सुषमा वासनिक, हरकंडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या