हंडरगुळीच्या मंदीर परिसरातील चिञ..
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड,जिल्हा पोलीस प्रमूख लातुर,स्था.गु,शाखा लातुर तसेच डी.वाय.एस.पी.अहमदपुर-चाकुर यांच्या मार्गदर्शनात व आदेशान्वये नेमलेले स्पेशल पथकांतील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वाढोणा पोलीस ग्राउॅंडवर उतरुन 2 नंबरचे धंदे करणा-यांची धरपकड करीत असल्याचे बघून व तशा न्यूज ऐकूण येथील बहूतांश अवैध धंदे करणारे अंडर ग्राउॅंड झाल्याचे दिसत असलेतरी गुटखा माञ बंद झालाच नाही.कारण,आजही हंडरगुळी,वाढवणा येथील शाळा,काॅलेज परिसरात गुटखा खुलेआम विकला जात असल्याचे दिसते.म्हणुन याबाबत वायगाव पाटीच्या एका विक्रेत्याला विचारणा केली असता,हंडरगुळीत एका मंदीर परिसरातुन गुटखा आणतोय आणि विक्री करतोय.
तर बंदी असतानाही कर्नाटकातून हंडरगुळीत आणि हंडरगुळीतून आसपासच्या गावात गुटखा येतोच कसा?यासाठी चौबारा रोड,उदगीर येथे केली तशी कारवाई केली तर हंडरगुळीतील गुटखा विक्रीतील मोठा मासा गळाला लागू शकतो.पण या करता कारवाई करण्याची मानसिकताही लागते.स्व:ता सपोनि.सुनिल गायकवाड हे.काॅ. संजय दळवे-पाटील, शिवप्रताप रंगवाळ,टी.टी.बळदे, पो.काॅ.बालाजी अक्केमोड,गोरख कसबे,दत्ताञ्य वाडकर,दयानंद (सोनु) सोनकांबळे या सहका-यांना सोबत घेऊन वाढवणा,हाळी व हंडरगुळी परिसर राञंदिवस पिंजुन काढत असल्याने गत कांही दिवसामध्ये या ठाण्याच्या हद्दीत लाखोंच्या मुद्येमालासह अवैध धंदे करणा-यांनाही ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत.तसेच परवाच चलत-फिरत दारु विक्री करणा-यास शेळगाव फाट्यावर बाईकसह कॅच केले.यामुळे बहूतांश अवैध धंदेवाले पळतीवर आणि पोलिस पथक गस्तीवर.असे चिञ हाळी हंडरगुळीत दिसत आहे.माञ,याचा तिळभर ही परिणाम हंडरगुळीच्या गुटखा विक्रेत्यांवर झाला नसल्याचे खुलेआम मिळणा-या गुटख्याकडे बघून म्हटले जाते.मंदीर परिसरातून गुटखा आणलोय.असे सांगू नकोस.असे गुटखा विक्री करणा-यांनी सांगितल्याचे एका किरकोळ विक्रेत्याने सांगितले.म्हणुन विचारले असता मी कित्येक दिवसापासून खुलेआम गुटखा विकत असल्याचे संबंधितांना माहित असूनही माझ्यावर अद्याप कारवाईची डेअरिंग कुणीच केली नाही.असे गुटखा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अवैध धंद्यामुळे गुन्हे व गुन्हेगारी वाढते.म्हणुन अवैध धंदे मुळासकट उखडून फेकण्यासाठी विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या आदेशान्वये जिल्हा पोलीस प्रमुख व स्था.गु.शाखाप्रमुखांनी नेमलेले पथक या भागात सतत ये-जा करीत असल्यामुळे परिसरात मटक्या सारखे अवैध धंदे करणा-यांमध्ये खाकीवर्दी बद्दल भीती निर्माण झाली असलीतरी ही गुटख्याची ठोक व किरकोळ विक्री धुमधडाक्यात सुरुचं आहे.
हा परिसर अवैध धंदेमुक्त करण्याचा विडा वाढवणा पोलिसांनी उचलला आहे.म्हणुन वाढवणा पोलीसांसह स्पेशल 'स्काॅड' पण 'ग्राउॅंड' वर आहे म्हणुन पोलिसांच्या *लाठी* चा *प्रसाद* खाण्यापेक्षा आपण शांत बसलेलेच बरे,असे म्हणत कांहीजण काळ्याधंद्यापासून चार हात लांबच आहेत.पण गुटखा तस्कर आणि किरकोळ विक्रेते हंडरगुळीत उदगीरातून प्रतिबंधीत गुटखा, सुगंधी जर्दा आणतात आणि १८० ₹ एक पुडा असे बेभावात विकतात.
आणि याची माहिती असणारे कांहीच कारवाई करत नसल्याने कांहीजण आयजी व एसपी कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे समजते.
गुटख्या सुळसुळाट पाहता
"असे रे कसे गुटखा बंदी,तुझे
प्रशासनाने केले हसे"
असे म्हटले जाते.....!
वरिष्ठांच्या आदेशान्वये वाढवणा पोलीस गुटखा व अन्य अवैध धंदेवाल्यांच्या पाळतीवर असून जनतेनी गुटख्यासह अवैध धंद्याची माहिती देऊन सहकार्य करावे.माहिती देईल त्या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाईल.अशी माहिती सपोनी.सुनिल गायकवाड यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या