(करणाऱ्या कारवाई कराव्यापारी असोसिएशनची मागणी)
चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती / परतवाडा :-शहरातील गुजरी बाजार येथील राज बुक डेपो चे संचालकावर आज २४ मार्च रोजी एका व्यक्तीने रॉड ने प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. यामुळे या घटनेचा तीव्र निषेध करीत ऑल ट्रेडर्स असोसिएशन अचलपूर चे पदाधिकारी यांनी परतवाडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुरेश म्हस्के यांना निवेदन देऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे . या घटनेमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे . या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २५ मार्च रोजी गुजरी बाजार येथील राज बुक डेपो चे संचालक अरुण कुमार खंडेलवाल वय ६८ यांच्या एका व्यक्तीने लोखंडी रॉड ने प्राणघातक हल्ला करून दुकानातील वस्तू काच चे मोठे नुकसान केले. यामुळे या
हल्ल्यात अरुण खंडेलवाल व राज खंडेलवाल दोन्ही जखमी असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पूर्वी सुद्धा अशा घटना घडल्याने
कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा
उल्लेख ही निवेदनात केला आहे. यामुळे
तत्काळ त्या आरोपीला अटक करून गुन्हा
दाखल करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून
करण्यात आली आहे. आणि भविष्यात अशा
घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना
राबविण्याचे मागणी सुद्धा करण्यात आली
आहे . यावेळी अजय अग्रवाल,
, आकाश श्रीवास्तव, पप्पू
सिरोया, राम खंडेलवाल, गणेश वर्मा, पंकज
गुप्ता, मयंक शर्मा, गिरीश दौलतानी, बजरंग
खंडेलवाल, कपिल साबू आदी उपस्थित
होते. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची
प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली
आहे.


0 टिप्पण्या