Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. डॉ. शहारे यांना औषधनिर्माणशास्त्रातील राष्ट्रीय पुरस्कार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राचार्य डॉ. आतिश शहारे यांना औषधनिर्माणशास्त्रातील राष्ट्रीय स्तरावातील पुरस्कार घोषित झाला. सदर पुरस्कार मध्यप्रदेश सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने प्रायोजित केलेला होता. स्थानिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत आतिश शहारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार  सर्वोत्कृष्ट "  सहाय्यक प्राध्यापक पुरस्कार " म्हणून प्रदान करण्यात आला. दुसरीकडे याच परिषदेत प्रा. डॉ. शहारे यांना वैज्ञानिक शोध निबंध सादरीकरणात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना युवा संशोधन पुरस्कारानेही गौरान्वित करण्यात आले. ही परिषद सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्चच्या सहकार्याने इंदोर येथे स्मृती कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशनमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या यशाचे श्रेय शहारे यांनी संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्था सचिव डॉ, वृंदाताई करंजेकर, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. लोकानंद नवखरे, आणि सहकारी प्राध्यापकवृंद यांना दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या