मोरतळवाडी काॅर्नरवर पकडला गुटखा;
दोघांवर गुन्हा दाखल ...
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील हाळी गावा जवळील मोरतळवाडी काॅर्नर येथील एका टी स्टाॅलवर पोलिसांनी छापा टाकून अवैध्यरित्या विक्री होत असलेला गुटखा पकडला आहे.सदर व्यक्ती विरोधात वाढवणा ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाढवणा बु.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,एस.पी. अमोल तांबे,ऐ.एस.पी. मंगेश चव्हाण,डीवायएसपी अरवींद रायबोले यांच्या आदेशानुसार वाढवणा पोलिस अवैध धंद्यावर वाॅच ठेवून असताना मिळालेल्या माहितीनुसार निळकंठ बस्वराज मठपती रा.हाळी (ता.उदगीर) व गिरी विश्वनाथ यसमोड रा.गादेवाडी(ता.अहमदपूर)हे स्वतःच्या फायद्यासाठी हाळी गावाजवळील मोरतळवाडी काॅर्नर येथील संगमेश्वर टी सेंटरवर किरकोळ गुटखा विकत असल्याची खबर मिळताच त्वरीत तेथे धाड टाकून झडती घेतली असता आरोग्यास हानीकारक तसेच बंदी असलेला गुटखा,सुगंधी जर्दासह दोघांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी पकडले.त्यावेळी पोलिसांना केशर युक्त विमल पान मसाला ११७ पुड्या,व्ही-१ नावाच्या १३९ तंबाखू पुड्या असा एकूण किंमत ९७५ रूपयेचा माल मिळाला.म्हणुन पोलिस कर्मचारी शि.रा.केंद्रे यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपीं विरोधात गुरूवारी रात्री बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.असून अधिक तपास सपोनि. सुनिल गायकवाड हे करत आहेत.
या कारवाईमुळे गुटखा विकणा-यांमध्ये भीती पसरली असून परिसरातील बहूतांश टप-या बंद कांही कालावधी नंतर दिसतात. माञ,हटकरवाडी तांडा ता.चाकुर येथील एक आणि हंडरगुळी ता.उदगीर येथील एकजण हाळी येथे एका मिस्ड काॅलवर राञी, बेराञी व पहाटे हवा तेवढा गुटखा,सुगंधीत जर्दा कांही टपरी,हाॅटेल,गल्लीबोळातील दुकाणदारांना होमडिलीवरी आणुन देतात.अशी कुजबूज दाखला आॅफीस मागे, महादेव मंदीर,जुना बस थांबा परिसरातील प्रत्यक्षदर्शींमध्ये आहे.
बंदी असलेला गुटखा, सुंगधीत जर्दा सारखा माल मग तो एक पुडा असो किंवा एक बोरी असो. कारवाई तर करणारच. तेंव्हा कुणीही याच्या फंद्यात पडू नये.तसेच गुटखा विकणारे छोटे,मोठे विक्रेत्यांची माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवले जाईल.गल्लीबोळातील छोट्या,मोठ्या दुकाण,
हांटेल,पान टपरीधारकांनी याची विक्री करुनये, अन्यथा कारवाई करण्यात येईल.असा इषारा सपोनि.सुनील गायकवाड,स.पो. उपनि.प्रवीण हालसे,हेकाॅ. संजय दळवे,शिवप्रताप रंगवाळ यांनी दैनिक, दंडाधिकार जवळ दिला आहे.


0 टिप्पण्या