Ticker

6/recent/ticker-posts

वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :-शहरातील वैष्णवी कॉन्व्हेंट परिसरात आज दिनांक ३० मार्च २०२६ रोजी दुपारी साधारण १२ वाजताच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. परंतु आगीच्या काही तासांपूर्वी या परिसरातील विद्यार्थ्यांना सुट्टी झालेली होती. शाळेच्या परिसरात अचानक फ्रीजमध्ये झालेल्या स्पार्कमुळे आग लागली आणि क्षणार्धात धुराचे लोट पसरू लागले. परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना घडताच परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. मात्र संकटाच्या या क्षणी सामाजिक बांधिलकी जपत इंजि. संदीपभाऊ  बावनकुळे नगरसेवक प्रभाग क्रमांक ५ तथा गटनेता यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगर परिषद अग्निशामक दल, पोलीस स्टेशन तसेच इलेक्ट्रिक विभागाला कळवून मदत कार्याला वेग दिला.
त्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे काही मिनिटांतच घटनास्थळी यंत्रणा दाखल झाली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेनंतर कैलास मेंढे व रोहित ऊके यांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. प्राथमिक तपासात ही आग फ्रीजमधील विद्युत स्पार्कमुळे लागल्याचे समोर आले आहे. यावेळी उन्हाळ्यामध्ये गॅस सिलेंडर व फ्रीज तपासणी वेळोवेळी करून काळजी घ्यावी असे आव्हान इंजि. संदीप बावनकुळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या