चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-पडसाळी ता. माढा येथील जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. चांदणी राहुल मुसळे यांची तर उपाध्यक्ष पदी सौ. माधुरी अमोल नलवडे यांची बिनविरोध निवड करून एक आदर्श निर्माण करण्याचे काम पडसाळी ता. माढा येथील पालकांनी केले आहे. अटीतटीच्या व संघर्षपूर्ण वातावरणात होणाऱ्या निवडीच्या पार्श्वभुमीवर दोन्ही महिला पालक अध्यक्ष पदी व उपाध्यक्ष पदी नियुक्त करून एक वेगळी ओळख निर्माण करण्याच काम केलं याच निवड प्रक्रियेच अनुकरण सर्वच शाळांनी घेऊन एक चांगली पिढी घडविण्याचं काम केलं पाहिजे. ही शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी पुढाकार घेतला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सलगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महावीर मुटकूळे, प्रविण पाटील, प्रकाश पाटील, दिपक देशमुख, सुनिल पाटील, सचिन पाटील, कुमार मुसळे, संदीप देशमुख, अमोल नलवडे, दत्तात्रय थोरात, मुख्याध्यापिका गुंड मॅडम व त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ यांच मोलाच सहकार्य मिळालं.
यावेळी पालक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते शालेय साहित्य व क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आले.


0 टिप्पण्या